न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३१ डिसेंबर २०२२) :- एकटी असल्याचे पाहुन मॅनेजरने फिर्यादी महिलेचा हात जबरदस्तीने पकडला. फिर्यादीस जवळ ओढुन “ माझ्याशी फ्रेंडशीप कर, मला किसींग दे ” असे म्हणत फिर्यादीच्या छातीला हात लावत त्यांच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले.
हा घडलेला प्रकार फिर्यादीने अकाऊंट मॅनेजर सह आरोपी २ यास सांगीतला. तेव्हा सह आरोपी २ ने देखील फिर्यादी यांना “जाने दो, ज्यादा टेंशन मत लो, तुम मेरे साथ में फ्रेंडशीप करलो, में तुम्हे लॉज में लेकर जाऊंगा ” असे म्हणुन उलट फिर्यादी यांचाच विनयभंग केला आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे.
ही घटना (दि. ७/१२/२०२२) रोजी सायं ६.०० वाजताचे सुमारास तसेच (दि. २७/१२/२०२२) रोजी दुपारी १२.४५ वाजताचे सुमारास व सायंकाळी ६.०० वाजताचे सुमारास तळवडे रोड, यश इंटरप्रायझेस व एम. वाय. ट्रेडींग या कंपनीमध्ये घडला.
महिला फिर्यादी यांनी आरोपी मॅनेजर उत्तम बाबुराव पवार (वय ४८ वर्ष, रा. सहयोगनगर, तळवडे), अकाऊंट मॅनेजर जयंत जयदेव बर्मण (वय ३० वर्ष, रा. छत्रपती शिवाजी शाळेजवळ, तळवडे) यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. चिखली पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे.


















