न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३१ डिसेंबर २०२२) :- सांगलीतील एसएम ग्लोबलमधील आरोपीने शेअर मार्केट कंपनीने व्हॉटसअप व झुम मिटींगद्वारे कंपनीमध्ये गुंतवणुक करा, असे आवाहन करुन गुंतवणुक केल्यास मोठा परतावा मिळेल. एका वर्षात गुंतवणुक केलेली रक्कम दुप्पट होईल, असे फिर्यादीला अमिष दाखवले. फिर्यादीचा विश्वास संपादन केला. त्यामुळे फिर्यादी यांनी आरोपीच्या बँक खात्यावर गुंतवणुकीसाठी रक्कम पाठविली. आरोपीने कोणताही परतावा दिला नाही.
फिर्यादीने गुंतवणुक केलेली रक्कम आरोपीने त्याच्या कंपनीमध्ये फिर्यादीच्या नावाचे एस.एम.आय.डी. तयार केला. त्या आय.डी. वर मेटा ट्रेडर-५ या अप्लीकेशन मार्फत युजर आयडी तयार केला. त्या आय. डी. चा स्वतःच्या कंपनीकडे अक्सेस व कंट्रोल ठेवला. त्या आय.डी. वरील फिर्यादीचा ऑनलाईन अॅक्सेस बंद करून फिर्यादीची १९,५२,५०० रुपयांची आर्थिक फसवणुक केली. त्या रक्कमेचा अपहार केला आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे.
हा प्रकार सन २०१९ ते सन २०२२ मध्ये शिवम मोटर्स, शॉप नंबर १२, आर्य समाज भवन, आर्यविद्या मंदीर जवळ, पिंपरी येथे घडला. फिर्यादी शैलेद्रकुमार शांतीलाल मेहता (वय ४५ वर्षे, रा. २०१, ए विंग, रामबाग अपार्टमेंट, मोरया हॉस्पीटल जवळ, चिंचवड) यांनी आरोपी मिलींद बाळासो गाढवे (रा. सांगली) याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. पिंपरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.















