न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३१ डिसेंबर २०२२) :- कंपनीतील कामगार योगेश खैरे यांचा तीन महिन्यांचा आणि प्रसाद कामनदार यांचा सहा महिन्यांच्या पगारातून पीएफसाठी ठराविक पैसे कपात केले. तो हिस्सा भविष्य निर्वाह निधी कार्यालय, पुणे येथे न भरता स्वतःच्या आर्थिक फायद्याकरीता वापरुन कामगारांचा विश्वासघात केला. रकमेचा अपहार करीत दोघांची १५,६०० रुपयांची आर्थिक फसवणूक केली आहे.
हा प्रकार जानेवारी २०१९ ते मार्च २०१९ पर्यंतचे व माहे ऑगस्ट २०२१ ते जानेवारी २०२२ पर्यत फोकस रोबोटोमेशन प्रा.लि., प्लॉट नं. १६०, सेक्टर नं.७, एम.आय.डी. सी. भोसरी येथे घडला.
फिर्यादी सुजन रविचंद्रन मुदलीयार (वय ५३ वर्ष, रा. ए-२/५, ब्रम्हा अंगण, साळुंखे विहार रोड, कोंढवा, पुणे) यांनी आरोपी नितीन शंकर जितुरी (वय अंदाजे ५१ वर्षे, सी. ५०१, ९ ग्रीन पार्क, सहकारनगर -२, पर्वती, पुणे), मकरंद राजगुरु (वय अंदाजे ५० वर्षे, रा. ७/३०४, वेदविहार, चांदणी चौक पौड रोड कोथरुड) यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. एमआयडीसी भोसरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.















