न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ जानेवारी २०२२) :- फ्लिपकार्ड शॉपिंग अँपवरून फिर्यादीने किचन सिंग (प्लास्टिकची भांडी ठेवण्याची जाळी) मागितली होती. तेव्हा मोबाईल धारकाने फोन करून. तुम्ही दिलेली ऑर्डर रद्द झाली आहे.
तुम्ही भरलेली रक्कम रुपये २९९ ही परत मिळण्यासाठी any desk remote desktop हा अॅप डाऊनलोड करून घ्या. त्याप्रमाणे फिर्यादीने Alpemix अॅप डाऊनलोड केला. त्यांनी फिर्यादीला एटीएम कार्ड स्कॅन करण्यास सांगितले असता प्रथम २०,२२० रुपये कट झाले व त्यानंतर लगेचच दुस-या टप्यात रक्कम रुपये २०,००० अशी एकूण रक्कम रुपये ४०,२२० रुपये फिर्यादीचे स्टेट बँक ऑफ इंडीया या खात्यातून काढून घेतले, असे फिर्यादीत म्हटले आहे.
ही घटना (दि. १०/०८/२०२२) रोजी १२.४० सुमारास फिर्यादीच्या घरी ४२७, इंद्रायणी पार्क, वडगाव रोड, आळंदी येथे घडली. फिर्यादी केदार सुधीर कांबळे (वय ४० वर्षे, रा. ४२७, इंद्रायणी पार्क, वडगाव रोड, आळंदी देवाची) यांनी आरोपी अज्ञात इसमाच्या विरोधात फिर्याद दिली आहे. आळंदी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.















