न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ जानेवारी २०२२) :- पिडीत महिलांना आरोपींनी वेश्या व्यवसायाठी गि-हाईक मिळवून दिले. वेश्या व्यवसायाच्या कमाईवर आरोपींनी उदरनिर्वाह केला. पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी आरोपींना ताब्यात घेतले.
ही कारवाई आळंदी पोलिसांनी (दि. ३०) रोजी सायं ७.३५ वा. चे सुमारास मोझे शाळेजवळ, दिघी येथील अभिषेक लॉज येथे केली.
याप्रकरणी पोलिसांनी मॅनेजर प्रेमकुमार सुखदेव सोळंके (वय १९ वर्ष, रा. मु.पो.शे, ता. गेवराई, जि. बीड, सध्या रा. अभिषेक लॉज, शाळेजवळ, दिघी), लॉज मालक शिरीष शंकर काळे (वय ४० वर्षे, रा.आर अॅण्ड डी कॉलनी, एल क्वॉर्टर नं.४५५, टाईप ३, कळस, विश्रांतवाडी), गि- हाईक वामन तुळशीदास सोळंके (वय ४२ वर्षे, रा. दिनानाथ मंगल कार्यालयामागे, वडगांवरोड, आळंदी), गि-हाईक सुरेश भिकु निंबाळकर (वय ६० वर्षे, रा. १८/२, रुणवाल कॉलनी, दिघी, गौरव चौहान (वय २४ वर्षे, रा. बोपखेल) यांना अटक केली आहे. एक आरोपी नजर चुकवून पळुन गेला आहे.















