न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ जानेवारी २०२२) :- बेकायदेशीररीत्या आरोपीने १ किलो ४६ ग्रॅम वजनाचा गांजा हा अंमली पदार्थ, ९०,००० रुपये किंमतीच्या निळ्या रंगाची यमाहा कंपनीची (एफ. झेड. एम.एच./१२/के.बी. २१४७) दुचाकी व ९,००० रुपये किंमतीचा गडद हिरव्या रंगाचा रियलमी कंपनीचा (आय.एम.इ.आय.क्र. ८६६९०९६३७२८६१७२५ व ८६६९०९०६३७२८६०९२५) मोबाईल, असा एकूण १,२५,२०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जवळ बाळगला.
याप्रकरणी गुन्हे शाखा, अंमली पदार्थ विरोधी पथकाने (दि. ३१/१२/२०२२) रोजी १.५५ वा. चे सुमारास वाकड पोलीस स्टेशन हद्दीतील कावेरीनगर भाजी मंडईच्या बाजुला असलेल्या खेळाच्या मैदानातील संरक्षण भिंतीच्या आडोशाला रस्त्याच्या कडेला कारवाई केली.
पोलिसांनी आरोपी राजेंद्र उर्फ राजु उर्फ पप्पु अभिमान जाधव (वय २९ वर्षे, रा कावेरीनगर भाजी मंडईचे बाजुला असलेली झोपडपट्टी, वाकड) याला अटक केली असून, आरोपी निलेश सुकळे (संपुर्ण नाव व पत्ता महिती नाही, रा वाघोली) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. आरोपीने गांजा हा अंमली पदार्थ दुसरा सह आरोपी याच्याकडुन आणला असल्याचे तपासात सांगितले.















