न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ जानेवारी २०२२) :- दरोडा विरोधी पथकाकडुन गुटखा पुरवठा करणाऱ्या ५ आरोपींना अटक करून, त्यांचेकडुन एकूण ४३,०३,२०० चा गुटखा, १५,००,००० लाखांचा आयशर टेम्पो व १ महिंद्रा पिकअप जप्त केली आहे.
३१ डिसेंबर, नववर्ष स्वागत व भिमा कोरेगाव येथे शौर्यदिनाच्या बंदोबस्तानिमीत्त पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड यांनी गुन्हे शाखेकडील पथक व युनिट यांना कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही या अनुषंगाने पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे हद्दीत अवैध धंदयावर कारवाई करण्याबाबत आदेश दिले होते. व.पो. नि. रामदास इंगवले, दरोडा विरोधी पथक गुन्हे शाखा, पिंपरी चिंचवड यांनी पथकाकडील अधिकारी व अंमलदार यांना मार्गदर्शन करुन अवैध धंदयावर कारवाई करण्याबाबत आदेश दिले होते. (दि. ३१/१२/२०२२) रोजी दरोडा विरोधी पथकाकडील पोलीस शिपाई विनोद वीर व पोलीस नाईक गणेश हिंगे यांना त्यांच्या गुप्त बातमीदारांमार्फतीने कुरुळी, निघोजे रोडच्या डाव्या बाजुस दिक्षीका लॉजिस्टीक कंपनीच्यासमोर मोकळया जागेमध्ये गुटख्याने भरलेला एक ट्रक उभा असुन त्या ठिकाणी काही इसम हे ट्रकमधिल माल एका महिंद्रा पिकअप गाडीमध्ये भरत आहे, अशी खात्रीशिर बातमी मिळाली.
कारवाई अनुशंगाने व पो. नि. रामदास इंगवले यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक अबरिष देशमुख, पोलीस उप-निरीक्षक मंगेश भागे, सहाय्यक पो. फौजदार महेश खांडे, पोलीस हवालदार १०७२ नितीन लोखडे, पोलीस नाईक १०६२ गणेश हिंगे, पोलीस नाईक १६७४ सागर शेडगे, पोलीस शिपाई २९४७ विनोद वीर पोलीस शिपाई २६४३ गणेश सांवत व पोलीस शिपाई २६७३ सुमित देवकर यांचे पथक तयार करुन त्या ठिकाणी छापा मारुन कारवाई करण्याबाबत आदेश दिले.
पथकाने कुरुळी निघोजे रोडच्या डाव्या बाजुस दिक्षीका लॉजिस्टीक कंपनीच्या समोर मोकळया जागेमध्ये मु.पो. कुरुळी गाव, ता खेड, जि. पुणे येथे जावुन दोन पंचासह छापा टाकून कारवाई केली. आरोपी राजु राम देवासी (वय २१ वर्षे रा पाटील नगर, राम सोसायटी. चिखली), राकेश बीजराम देवासी (वय १९ वर्षे रा चिखली), दुधाराम बेहरराम देवासी (वय – २९ वर्षे), श्रावण कुमार धनेशराम देवासी (वय २९ वर्षे), गोकुळ मुरलीधर योगी (वय ३४ वर्ष रा मुं.पो. अंबड, ता नाशिक), यांच्या Ashok leyland ट्रक मधुन एका महिंद्रा बोलोरो पिकअपमध्ये कुख्यात गुटखा विक्रेता नरेश देवासी (रा मोरे वस्ती, चिखली) याच्या सांगण्या वरून त्याने विक्रीकरीता मागविलेला महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेला गुटखा, पान -मसाला. तंबाखुजन्य पदार्थ या असुरक्षित आरोग्यास घातक/ अपायकारक असा एकुण कि.रू. ४३.०३.२०० चा प्रतिबंधीत तंबाखुजन्य पदार्थ विमल गुटखा पुरवठा करीत असताना मिळुन आले. हा गुटखा जागीच जप्त करण्यात आला आहे. तसेच १०,००,००० रु किं चा एका Ashok leyland ट्रक व ५,००,००० रु किं चा एका महिंद्रा बोलोरो पिकअप असा एकुण ५८,०३,२०० रू चा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. म्हाळुंगे पोलीस चौकी येथे पोलीस शिपाई विनोद वीर यांचे फिर्यादीवरुन गुन्हा नोंद करण्यात आला असुन पुढील तपास दरोडा विरोधी पथक करीत आहे.
ही कारवाई पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सह पोलीस आयुक्त मनोज लोहीया, अपर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे), स्वप्ना गोरे, सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे १. पद्माकर घनवट, सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे डॉ. प्रशांत अमृतकर यांच्या मार्गदर्शनाखाली दरोडा विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास इंगवले, सहाय्यक पोलीस निरीक्षक अंबरिष देशमुख, पोलीस उप-निरीक्षक मंगेश भांगे, पोलीस उप-निरीक्षक भरत गोसावी तसेच पोलीस अंमलदार महेश खांडे, नितीन लोखंडे, गणेश हिंगे, विनोद वीर, गणेश सावंत, सुमित देवकर, सागर शेडगे, गोविंद सुपे राजेश कौशल्य व विक्रांत गायकवाड यांच्या पथकाने केली आहे.















