- पोलीस आयुक्तालय, निगडी वाहतूक विभाग व प्राधिकरण कृती समितीचा उपक्रम…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ जानेवारी २०२२) :- सरत्या २०२२ इंग्रजी वर्षाला निरोप देत व नवीन इंग्रजी वर्षांचे स्वागत करत ” जल्लोष नूतन वर्षासाठी प्रवास स्वतःच्या सुरक्षेसाठी ” ह्या अभिनव उपक्रम पिंपरी चिंचवड शहर आयुक्तालय – निगडी वाहतूक विभाग व प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने राबविला गेला.
पिंपरी चिंचवड शहरात विशेषतः निगडी आकुर्डी प्राधिकरण परिसरात शाळा व महाविद्यालयांची संख्या अधिक असल्याने तरुणाईची संख्याही ही वाढलेली आहे.पर राज्यातूनही मोठ्या प्रमाणात विद्यार्थी या ठिकाणी उच्च शिक्षण हेतू येत असतात, त्यामुळे ३१ डिसेंबर व १ जानेवारी ह्या दोन दिवसात मोठ्या प्रमाणात ही तरुणाई नवीन वर्षाच्या स्वागत हेतू रस्त्यावर बाहेर पडते व आनंद साजरा करते.
या पर्वणीच्या निमित्ताने तरुणांमध्ये दुचाकी चालवत असताना रिफ्लेक्टर्स व हेल्मेट का महत्वाचे? याची माहिती प्राधिकरण नागरी सुरक्षा समितीचे एस पी ओ व पोलीस कर्मचारी यांनी “जल्लोष नूतन वर्षासाठी प्रवास स्वतःच्या सुरक्षेसाठी” या सामाजिक उपक्रमांतर्गत तरुणांना दिली. ३१ डिसेंबर व १ जानेवारी २०२३ रोजी उपक्रम राबविला गेला.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजया कारंडे, पोलीस उप निरीक्षक आर म्हस्के, प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समिती राज्य अध्यक्ष विजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपक्रमात सहभाग अर्चना घाळी, विजय मुनोत, सतीश देशमुख, गोपाळ बिरारी,बाबासाहेब घाळी,विशाल शेवाळे,अजय घाडी, सतीश मांडवे, राजेश बाबर, तेजस सापरिया, नितीन मांडवे,रामेश्वर गोहील, राहुल लुगडे, सुकेश येरूनकर,कपिल पवार,संजय थोरात,तेजस साकट,संदीप पोलकम,राजेंद्र कुंवर, उद्धव कुंभार, भरत उपाध्ये,ओंकार पाटील यांनी घेतला.
पोलीस निरीक्षक विजया कारंडे म्हणाल्या,” आनंदाच्या व जल्लोषाच्या वातावरणात तरुण हेल्मेट न घालताच रात्रीच्या वेळी घराच्या बाहेर पडत असतात. त्यामुळे त्यांची सुरक्षा धोक्यात येते. वर्षाची सुरुवात जर सुरक्षित प्रवासाने केली तर वर्षभर हेल्मेट वापरण्याची सवय अंगी बाळगली जाईल, पहिल्या दिवशी दंडात्मक कारवाई करण्यापेक्षा प्रबोधन करून सुरक्षेचे धडे देण्यासाठी आजचा हा उपक्रम पिंपरी चिंचवड शहर पोलीस व प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीच्या सहाय्याने शहरात राबविला गेला. ”
प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीचे अध्यक्ष विजय पाटील म्हणाले, ” पिंपरी चिंचवड शहराची लोकसंख्या ३० लाखाच्या जवळ पोहचली असून रस्ता अपघातांची संख्या सुद्धा दिवसेंदिवस वाढत आहे. वाहनांची गती व असुरक्षित प्रवास ह्या दोन मुख्य बाबी अपघातांना कारणीभूत ठरत आहे. यासाठी शहरात जनजागृती मोहिमेअंतर्गत “जल्लोष नूतन वर्षासाठी प्रवास स्वतःच्या सुरक्षेसाठी” हा उपक्रम पिंपरी चिंचवड शहरात राबविला गेला. तरुणांनीही यामध्ये उस्फूर्तपणे सहभाग घेतला. या प्रसंगी रिफ्लेक्टर्स चे वाटप करून मिठाईही वाटण्यात आली.”
उपक्रमाचे संयोजन निगडी वाहतूक विभागाचे पोलीस कर्मचारी लक्ष्मण कोल्हे, दीपक तांदळे, प्रिया पवार यांनी केले.















