- दोन वर्षाच्या वासराला कत्तलखाण्यात न्यायचा आरोपींचा बेत उधळला..
- रिक्षा चालकासह खाटिक व इतरांवर गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ जानेवारी २०२२) :- दुचाकीवरून मॉर्निंग वॉकसाठी जात असताना फिर्यादीला एक ऑटो रिक्षा (एम एच् १४ जी सी ९६५०) भरघाव वेगाने जाताना दिसली. फिर्यादीस रिक्षाचा संशय आल्याने त्यांनी रिक्षा थाबंवली. आरोपींनी ८२०० रुपये किंमतीचे गायीचे दोन वर्षाचे बेल सोरटी गीर जातीचे वासरु कापण्यासाठी खरेदी केल्याचे समजले. रिक्षामध्ये त्याला निर्दयतेने घेवुन जात होते. त्याला पोत्यात बारदाण्याने झाकलेले होते.
वासराला आण्णासाहेब मगर, नुरे महमद मज्जीद झोपटटी, डी मार्ट जवळ, चिंचवड स्टेशन येथील मोकळ्या जागेत नेऊन कापण्याचा आरोपींचा मनोदय होता. हा प्रकार (दि. १) रोजी सायं पाचच्या सुमारास निगडी प्राधिकरण येथील गणेश तलाव, क्विन्स टॉवर बीआरटी रोड, रावेत यथे घडला.
फिर्यादी अमोल नामदेव खुडे (वय ३६ वर्षे, रा. जुना पारशी बंगला, नेटके चाळ, विकासनगर, देहुरोड) यांनी रिक्षा चालक अब्दुल महेबुब सय्यद (वय २५ वर्षे, रा. आण्णासाहेब मगर झोपडपटटी, डी. मार्ट जवळ, चिंचवड स्टेशन), विधी संघर्षित बालक आयफाज जावेद कुरेशी (वय १७, रा. आण्णासाहेब मगर तुरे महमद मज्जीद झो. पटटी, डी. मार्ट, जवळ चिंचवड स्टेशन), हर्षद कय्युम कुरेशी (वय १९ वर्षे, रा. आंबेडकर चौक, चेंबुर बिल्डींग कन्नड गल्ली, लाल मंदीरचे बाजुला पिंपरी), पप्पु तुपे (वय २० वर्षे, तुपे वस्तीचे पाठीमागील नर्सरीचे जवळ, रावेत) यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. रावेत पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.















