न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ जानेवारी २०२२) :- कामावरुन फिर्यादी घरी आले असता आरोपींनी टेरेसवरुन फिर्यादीच्या डोक्यात बाटली टाकली. त्याचा जाब फिर्यादीने विचारल्याने तसेच जुन्या वादाचा राग मनात धरून आरोपीने जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने फिर्यादीच्या डोक्यात लोखंडी रॉड मारला. फिर्यादीने तो चुकवल्याने मानेवर लागुन फिर्यादी खाली पडले. त्यानंतर आरोपीने रॉडने फिर्यादीच्या पायावर मारुन गंभीर दुखापत केली.
दुसरा सह आरोपी याने फिर्यादीस लाथाबुक्यांनी तोंडावर व छातीवर मारहाण केली. फिर्यादीने मदतीसाठी आरडाओरडा केला असता फिर्यादीची पत्नी तिथे गेल्या असता आरोपीने त्यांना हाताबुक्याने मारहाण केली, असे फिर्यादीत म्हटले आहे. ही घटना (दि. ३१/१२/२०२२) रोजी रात्री ९.३० वा. चे सुमारास सुरभि हाईट्स सोसायटीच्या टेरेसवर, जामा मस्जिदजवळ, खराळवाडी, पिंपरी यथे घडली.
फिर्यादी संतोष एकनाथ भागवत (वय ४१ वर्षे, रा. फ्लॅट नं. ४०६, सुरभि हाईट्स, जामा मस्जिदजवळ खराळवाडी, पिंपरी) यांनी आरोपी योगेश गोडसे (वय अंदाजे ३० वर्षे), संकेत गोडसे (वय अंदाजे २६ वर्षे), चेतन गोडसे (वय अंदाजे ३२ वर्षे, सर्व रा. सुरभि हाईट्स सोसा. च्या मागे, खराळवाडी, पिंपरी) यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. पिंपरी पोलिसांनी गुन्हा दाखल करीत दोघांना अटक केली आहे.
















