न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ जानेवारी २०२२) :- विवाहित महिलेने गळफास घेत आत्महत्या केली. आरोपींनी शारीरीक व मानसिक त्रास दिला. या त्रासाला कंटाळुन गळफास लावुन विवाहितेने आत्महत्या केली. आरोपीतांनी महिलेला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले, असे फिर्यादीत म्हटले आहे.
ही घटना (दि. ३१/१२/२०२२) रोजी दुपारी १.०० ते २.०० वाजताचे दरम्यान ३०९/ बी विंग, सोलर पार्क, दत्तनगर, दिघी येथे घडली.
महिला फिर्यादी यांनी आरोपी महिला (वय ६२ वर्षे), संदीप जगन्नाथ जाधव (वय ४२ वर्षे), महिला (वय ४० वर्षे, सर्व रा. ३०९ / बी विंग, सोलर पार्क, दत्तनगर, दिघी) यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. दिघी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.
















