- विशाल वाकडकर यांच्या पाठपुराव्याला यश…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३ जानेवारी २०२२) :- वाकड येथील चिंधाजी भूमकर चौक ते डी. पी. रोड कस्तुरी चौक या रस्त्यावर पथदिवे लावण्याच्या कामाला सुरुवात झाली असून, राष्ट्रवादी युवक काँग्रेस महाराष्ट्र प्रदेशचे उपाध्यक्ष विशाल वाकडकर यांच्या प्रयत्नातून हे काम सुरू झाले आहे.
वाकड येथील चिंधाजी भूमकर चौक ते डी.पी. रोड हा रॉयल एट्राडा सोसायटीसमोरील अठरा मीटर रुंदीचा रस्ता तयार होऊन खूप दिवस झाले होते. तरी अद्यापही त्यावर पथदिवे लावण्यात आले नव्हते. त्यामुळे रात्रीच्या वेळी त्याठिकाणी सुरक्षित वाटत नव्हते. खूप अंधार होत असे. त्याठिकाणी काही विकृत लोक मद्यप्राशन करीत असत. त्याचाही इतर नागरिकांना त्रास होत होता.
या सर्व गोष्टींची दखल घेऊन विशाल वाकडकर यांनी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांशी संबधित रस्त्यावर पथदिवे लावण्याबाबत सूचना केल्या होत्या. तसेच त्यांना भेटून नागरिकांना होणाऱ्या त्रासाबद्दलही सांगितले होते. या सर्व गोष्टींचा पालिकेच्या संबंधित विभागाने आश्वासक विचार करून (दि. १) पासून प्रत्यक्ष कामास सुरुवात केली. काही दिवसात हा रस्ता पथदिव्यांच्या प्रकाशात उजळुन निघेल, नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी आम्ही कायम प्रयत्नशील राहू, असे विशाल वाकडकर यांनी सांगितले.
















