- काळेवाडीतील एका वकिलांचा तो मृतदेह असल्याची शक्यता…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३ जानेवारी २०२२) :- काळेवाडी येथे शिवशंकर दत्तात्रय शिंदे (वय ४५, रा.बोराडे वस्ती, मोशी) या वकिलांचे कार्यालय आहे. शनिवारी (दि. ३१) दुपारी हे वकील हे बेपत्ता झाले. त्यांच्या कुटुंबीयांनी वाकड पोलिस ठाण्यात याबाबत तक्रार दिली.
आरोपीच्या पत्नीशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरुन आरोपी राजेश्वर जाधव (रा. देगलुर, नांदेड, सध्या राहणार काळेवाडी, पुणे (पुर्ण नाव पत्ता माहीत नाही) याने फिर्यादीच्या पतीचा घातपात करण्याच्या उद्देशाने अपहरण केले असावे, असा फिर्यादीला संशय आहे.
दरम्यान, महाराष्ट्र- तेलंगणा सीमेवर एक अर्धवट जळालेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला आहे. तो मृतदेह वकिलाचा असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, मृतदेहाची अजून ओळख पटली नसून वाकड पोलिसांसह गुन्हे शाखेचे कर्मचारी घटनास्थळी रवाना झाल्याची माहिती वाकडचे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिली.
दरम्यान वाकड पोलिसांनी शिंदे यांच्या कार्यालयाची तपासणी केली असता कार्यालयातील वस्तू अस्ताव्यस्त असून त्याठिकाणी झटापट झाल्याची शक्यता आहे. तसेच रक्ताचे काही नमुने भेटले असून ते तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे.
















