- संजय ताकतोंडेच्या कुटूंबाची जबाबदारी घ्या शिवसेना व शिवशाही व्यापारी संघाची मागणी
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ७ मार्च) :- गेल्या अनेक वर्षांपासून मातंग समाज्याच्या १३% आरक्षणातुन लोकसंख्येच्या वर्गवारीनुसार अ ब क ड प्रमाने स्वतंत्र आरक्षण मागणीच्या लढ्यात बीड जिल्हातील संजय ताकतोंडे यांनी जलसमाधी घेऊन, आपल्या प्राणाची आहुती दिली आहे.
शिवसेना व शिवशाही व्यापारी संघाच्या वतीने पिंपरीतील आंबेडकर पुतळ्यासमोर त्यांना भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण करून, मानवी साखळीद्वारे लोकशाही पध्दतीने रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी पोलिस अधिकारी कैलास पवार यांनी आंदोलनातील महीला भगिनींना आरेरावीची भाषा वापरून, त्यांचा अपमान केला व लोकशाहीच्या मार्गाने केलेल्या मानवी साखळी आंदोलनास खिळ बसविली. पोलिसांनी दंडुकशाहीच्या जोरावर आंदोलन उधळविण्याचे कारस्थान केले. त्यामुळे प्रमुख पदाधिकारी आक्रमक झाले. तसेच पोलिसांनी आंदोलनातील महीला भगिनींना अपमानित केल्याच्या निषेधार्थ घोषणा दिल्या.

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात घोषणाबाजी करून, संजय ताकतोंडेच्या कुटूंबाची जबाबदारी घेण्याची मागणी शिवसेना विधानसभा संपर्कप्रमुख तथा शिवशाही व्यापारीसंघ प्रदेश अध्यक्ष युवराज दाखले यांनी केली आहे.
याप्रसंगी भाऊसाहेब आडागळे, आरूण जोगदंड, भाजपाचे किशोर हतागळे, संजय ससाने, धनंजय भिसे, शिवाजी साळवे, बापु वाघमारे, नितीन घोलप, हनुमंत नाना कसबे, दत्तु चव्हाण, विशाल कसबे, आशा शहाने, भिमा वाघमारे, गणेश आहेर, मारूती म्हस्के आदी प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.











