न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०४ जानेवारी २०२२) :- स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी पिडीत महिला यांना आरोपी यांनी पैशांचे अमिष दाखवले. त्यांना वेश्या व्यवसाय करण्यास प्रवृत्त केले. त्यातून मिळालेल्या रकमेतून आरोपी हे स्वतःची उपजिवीका भागवीत आहेत, अशी माहिती रावेत पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षास मिळाली.
सोमवारी (दि. २) रोजी सायं. ५. १५ वा.चे सुमारास साईदिप लॉज, रूम नं. २०२, सेक्टर नं २९, प्लॉट नं. २/७, धर्मराज चौक, इस्कॉन मंदिर रोड, रावेत येथे पोलिसांनी अचानक धाड टाकून आरोपींना ताब्यात घेतले.
पोलिसांनी केलेल्या कारवाईत ८,०४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. भिमराव दत्तोबा म्हस्के (वय ६० वर्षे, रा. ४५४/०४ अश्विनी कॉलनी, ज्योतीबा नगर, ज्ञानेश्वर मंगल कार्यालयाजवळ, काळेवाडी) याला पोलिसांनी अटक केली असून महिला आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे.















