- एकाला भीती घालून भर रस्त्यात लुटले; चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०४ जानेवारी २०२२) :- पायी चालत असताना दुचाकीवरील अनोळखी इसम फिर्यादीजवळ आला. ‘ मी महानगरपालिकेत काम करतो, तुमच्या घराचा टॅक्स बाकी आहे, तो भरा नाहीतर तुमच्यावर कारवाई होईल ‘ अशी बतावणी करून फिर्यादीला भीती घातली.
दरम्यान फिर्यादीच्या हाताच्या बोटातील २५,००० रूपये किमतीची सोन्याची वेढणी व ५०० रुपये किमतीचा जीओ कंपनीचा मोबाईल फिर्यादीने आरोपीला काढुन दिला. वेढणी व मोबाईल घेवुन आरोपी फिर्यादीला फसवुन निघुन गेला आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे.
ही घटना (दि. २) रोजी पाच वाजता सेलेस्टा सोसायटी जवळ, पवारवस्ती, चिखली येथे घडली. फिर्यादी अविनाश मनोहर पवार (वय ७५ वर्ष, रा. सुखवस्तु, से.नं. २५, प्लॉट नं. २८०, मदनलाल धिंग्रा मैदनाजवळ, निगडी) यांनी आरोपी अनोळखी इसमाच्या विरोधात चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु आहे.















