न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५ जानेवारी २०२२) :- चिंचवड विधानसभा मतदारसंघातील आमदार लक्ष्मण पांडुरंग जगताप (वय ५९) यांचे मंगळवारी सकाळी दीर्घ आजाराने निधन झाले. न्यू सिटी प्राईड इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
यावेळी संस्थेचे संस्थापक अरुण चाबुकस्वार, पृथ्वीराज यादव, पूनम वाघमारे व शाळेचे उपमुख्याध्यापक सचिन कळसाईत व शिक्षक व शिक्षेकत्तर कर्मचारी यांनी तसेच शाळेतील सर्व मुले व मुले यांनी पाच मिनिटं उभे राहून श्रद्धांजली वाहिली.
नगरसेवक ते पिंपरी-चिंचवडचे आमदार असा ३५ वर्षांचा धडाडीचा राजकीय प्रवास आणि शहर विकासाच्या वाटचालीतील मौलिक योगदान यामुळे त्यांच्या निधनाविषयी हळहळ व्यक्त केली. कर्करोगाशी झुंज देत असताना बाणेर येथील खासगी रुग्णालयात त्यांचे निधन झाले.
” नगरसेवक, महापौर ते विधीमंडळातील तडफदार प्रतिनिधी म्हणून कामाचा ठसा उमटवणारे नेतृत्व आज हिरावले आहे. ते कायम स्मरणात रहातील ”, असे उद्गार संस्थेचे संस्थापक अरुण चाबुकस्वार यांनी काढले.