- तब्बल बावीस लाखांचा माल जप्त; पोलिसांच्या दरोडा विरोधी पथकाची कारवाई…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५ जानेवारी २०२२) :- महाराष्ट्र शासनाने आरोग्यास घातक, अपायकारक प्रतिबंधीत केलेला गुटखा, पान मसाला, तंबाखुजन्य पदार्थांचा विक्री करण्याच्या उद्देशाने एका गोठयात साठा करून ठेवला आहे, अशी माहिती तळेगाव एमआयडीसी पोलिसांच्या दरोडा विरोधी पथक, गुन्हे शाखा यांना मिळाली.
पोलिसांनी (दि. ४) रोजी सायं. ६.३० वा. चे सुमारास नवलाख उंबरेतील जाधववाडी येथील पंडीत जाधव याच्या गोठयावर कारवाई केली. एकाला ताब्यात घेतले. त्याच्याकडून २१,८९,६६० रुपये किंमतीचा वेगवेगळया प्रकारचा माल जप्त केला. आरोपीने हा माल राजुभाई सुपारीवाला, अहमदाबाद याच्याकडुन विकत घेऊन तो आरोपी जाधव याच्या गोठयात ठेवुन तो गुटखा जवळ बाळगला.
हनुमान रुपाराम चौधरी (वय २८ वर्षे रा. बी ३०२, प्लाझो ग्रीन, वडगाव मावळ) याला पोलिसांनी अटक केली आहे. पंडीत जाधव (रा. जाधववाडी, नवलाख उंबरे, वडगाव मावळ), राजुभाई सुपारीवाला (अहमदाबाद) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.















