न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ७ मार्च) :- पिंपळे सौदागर येथील स. नं. ३ आणि ८ पैकी आरक्षण क्र. ३६२ अण्णासाहेब मगर विद्यालयाच्या पाठीमागे व वरून पार्क शेजारी नगरसेवक विठ्ठल ऊर्फ नाना काटे यांच्या संकल्पनेतून शिवसृष्टी शिल्प उभारणी केली जाणार आहे.
मैदानाच्या सुरक्षा भिंतीवर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनातील प्रसंग दर्शवणारे शिवसृष्टी शिल्प (म्युरल्स) ऐतिहासिक वास्तू शिल्पाचे तसेच अत्याधुनिक सोयीसुविधाने परिपूर्ण असणाऱ्या खेळाच्या मैदानाचे भूमिपूजन आज गुरुवार (दि. ७) रोजी सकाळी दहा वाजता हभप. समाधान महाराज शर्मा यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे, नगरसेविका शितल काटे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे, माजी नगरसेवक शंकर काटे, ज्ञानेश्वर हांडे, ज्ञानेशवर काटे, विलास काटे, विजय काटे, संपत मेटे, शिवाजी काटे, पोपट जगताप, अर्जुन काटे, सोपान काटे, शेखर काटे, राजू काटे, प्रकाश काटे, गणेश काटे, एकनाथ ववले, डीगंबर जगताप, प्रमोद काटे, जयवंत बोडके, नितीन काटे,संजय काटे, तानाजी काटे, सुरेश काटे, गोविंद काटे, गोविंद वलेकर, युवराज काटे, सुनील काटे, हरेश नखाते,महापालिकेचे स्थापत्य विभागाचे उपभियंता सुनील पाटील, कनिष्ठ अभियंता नरेश जाधव,हभप.विलास बाबुराव काटे, अर्जुन काटे,चंद्रकांत काटे, ग्रामस्थ व सोसायटीमधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.











