न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ९ जानेवारी २०२२) :- ‘ पेटीएम बँकेची केवायसी अपडेट करा ‘ असा मेसेज अज्ञात इसमाने फिर्यादीला केला. फिर्यादीने आलेली लिंक http://bitly.ws/upj9 यावर क्लिक केल्यानंतर पेटीएमचे अॅपलीकेशन ओपन झाले. नंतर लगेच त्यावर बँकेचा ओटीपी टाकण्यास सांगितला. फिर्यादी यांनी त्यावर ओटीपी टाकला. तेव्हा त्यांचे पेटिएम बँक खाते क्रं. ९८५०६४०२३१ यातुन आरोपीने त्याचे पेटीएम बँकेच्या खात्यावर टप्प्याटप्याने एकूण ४९,००० रुपयांची रक्कम काढुन घेतली.
आरोपीने त्याची ओळख लपवून फिर्यादी यांची ऑनलाईन फसवणूक करुन मालमत्तेचा अप्रामाणीक अपहार केला आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे. ही घटना (१९/०९/२०२२) रोजी सकाळी ७.३७ वा. चे सुमारास तनिष ऑर्चिड सोसायटी, बि. नं. एम, फ्लॅट नं. १२०२, च-होली, या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने घडली.
फिर्यादी सुरेश रावजी म्हसे (वय ५७ वर्षे, व्यवसाय नोकरी, रा. च-होली) यांनी आरोपी मो.नं. ७६५७०२६२९६, ९६९३८७०९७६, ८०९७७१६३११ वरील अज्ञात इसमाविरोधात दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु आहे.















