न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ९ जानेवारी २०२२) :- प्रमियर लिग स्पर्धेत प्रतापगड वॉरियर्स व राजगड वॉरियस यांच्या मॅचमध्ये फिर्यादी व आरोपीबरोबर झालेल्या वादाचा राग मनात धरला. आरोपीने फिर्यादीस स्टम्प व बॅटने डोक्याच्या डाव्या बाजुस, डाव्या खांदयावर, दोन्ही हातावर, पायावर नडगीवर मारहाण करुन दुखापत केली. सह आरोपी ६ याने सर्व आरोपींना स्टम्प पुरविले, असे फिर्यादीत म्हटले आहे.
हा प्रकार (दि. ८) रोजी दुपारी १२.०० वाचे सुमारास पुसाने, मावळ येथील संजय बारणे यांच्या मैदानात घडला.
फिर्यादी भरत किसन वाटाणे (वय २६ वर्षे, धंदा शेती, रा. ओवळे, मावळ) यांनी आरोपी शशिकांत साठे, सागर साठे, शेखर साठे, लखन साठे, तेजस तावरे, राजु साठे (सर्वजण रा. ओवळे मावळ) यांच्या विरोधात शिरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु आहे.















