- ७५ वर्षीय वृद्धाकडून किळसवाना प्रकार; मुलीच्या आईची पोलिसात धाव…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ जानेवारी २०२२) :- कोथिंबीर आणण्यासाठी फिर्यादी यांची मुलगी दूकानात गेली होती. त्यावेळी दुकानाच्या बाजुला राहणाऱ्या आरोपीने फिर्यादीच्या मुलीस पेरु खायला पैसे देतो, असे सांगितले. तिला जवळ बोलावुन घेउन ती लहान असल्याचे माहीत असुनदेखील तिला घराच्या शेजारील गोठयात नेले. तिच्यावर अतिप्रसंग केला, असे फिर्यादीत म्हटले आहे.
हा प्रकार (दि १०) दुपारी १२.०० वा चे सुमारास धोंडीबा भालेकर यांच्या गोठयात, चव्हाणनगर, तळवडे येथे घडला.
महिला फिर्यादी यांनी आरोपी धोंडीबा भालेकर (वय अंदाजे ७० ते ७५ वर्षे), रा. तळवडे) याच्या विरोधात देहुरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु आहे.
















