न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ जानेवारी २०२२) :- ‘ तुला आमच्या घरात परत कधीच घेणार नाही. तु काळी आहेस ‘ असे म्हणत आरोपींनी फिर्यादी यांना मारहाण करुन जिवे मारण्याची धमकी दिली. फिर्यादीच्या डोळयात मिरची ची पुड टाकली. ‘ तु परत कशी नांदण्यासाठी आली; तुला आमच्याकडे नांदायचे असेल तर, तु तुझ्या आईकडुन एक लाख रुपये घेवुन ये ‘ असे म्हणत आरोपींनी फिर्यादी यांना सतत उपाशीपोटी ठेवुन त्यांचा मानसिक व शारीरीक छळ केला आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे.
ही घटना (दि. १३/०९/२०२१) ते दि. २७/१२/२०२२) पर्यंत वेळोवेळी च-होली फाटा व भोसरी येथे घडली.
महिला फिर्यादी यांनी आरोपी पती चंद्रकात पांडूरंग काळे (वय २८ वर्षे, रा. व्दारका स्क्वेर बिल्डिंगच्या शेजारी भाडयाने राहत आहे हवेली, पुणे), महिला आरोपी, दिर दिपक पांडूरंग काळे (वय ४० वर्षे), दिर भरत पांडूरंग काळे (वय ३७ वर्षे) यांच्या विरोधात दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु आहे.















