- ‘ न्यूज पीसीएमसी ‘ च्या त्या वृत्ताची मनसेकडून दखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ जानेवारी २०२२) :- आकुर्डीतील म्हाळसाकांत शाळेतील गेटच्या बाहेर झाडावर लटकलेला जाहिरातीच्या बोर्डाचा रिकामा सांगाडा पालिका प्रशासनाने काढला आहे. त्यामुळे पालकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.
या प्रकरणी ‘ न्यूज पीसीएमसी ‘ ने वृत्त प्रसिद्ध केले होते. या वृताची दखल घेत मनसेच्या विद्यार्थी सेनेने पालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाकडे रीतसर तक्रार करीत बोर्ड हटविण्याची मागणी केली होती. वृक्ष प्राधिकरणाच्या कर्मचाऱ्यांनी संबंधित बोर्ड काढला आहे.
शाळेत दररोज हजारो विद्यार्थी येत असतात. त्यामुळे हा बोर्ड विद्यार्थ्यांच्या अंगावर पडून दुर्घटना घडण्याची शक्यता बळावली होती.















