न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ जानेवारी २०२२) :- काही दिवसांपूर्वी डोक्यात सिमेंटचा ब्लॉक घालुन एकाची निर्घुण हत्या केल्याची घटना रावेतमध्ये घडली होती. मारेकरी मोकाट होते. याप्रकरणी रावेत पोलिसांनी मोठ्या शिताफीने आरोपीला अटक केली आहे. पूर्व वैमण्यास्यातून व दारू पिण्याच्या वादावरुन आरोपीने त्याचा मयत मित्र याच्या डोक्यात सिमेंटचा ब्लॉक घालुन त्याला गंभीर जखमी करून संपवुन टाकण्याच्या इरादयाने मित्राचा खुन केला असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
राजेश शिवलिंग जाधव (वय ३८ वर्ष, रा. बिजलीनगर, चिंचवड) असे खून झालेल्या इसमाचे नाव आहे. जागा मालक विकास प्रकाश जाधव (वय ३६ वर्ष रा. रावेत गावठाण) यांनी रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. सोमनाथ सुभाष बडदाळे (वय ३८ वर्ष, रा. सध्या आकुर्डी स्टेशन मोकळया जागेत, आकुर्डी, मुळ पत्ता – देवीनगर, आळंद रोड, गुलबर्गा, कर्नाटक) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेय माहितीनुसार, राजेश शिवलिंग जाधव याचा दि. ०३/०१/२०२३ रोजी ते दि ०४/०१/२०२३ रोजी ०९.४५ वा दरम्यान खुन झाल्याबाबतचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मयत इसमाचा घटनास्थळी मोबाईल मिळुन आला नाही. तसेच मयत इसमाचा सोमनाथ बडदाळे हा मित्र असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. मयताचा मोबाईल आरोपी घेऊन गेला असल्याचा धागा पकडत मयताचा मित्र सोमनाथ याच्यावर पोलिसांना संशय आल्याने त्याचा शोध घेत घेतला. (दि. ५) रोजी सायंकाळी ५.३० ते ८.२५ वा. सुमारास कोयते वस्ती, पुनावळे येथून आरोपी हा पायी चालत जात असताना त्याला पोलीसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडे मयताचा मोबाईल मिळुन आला. आरोपीकडे अधिक चौकशी केली असता आरोपीने पूर्व वैमण्यास्यातून व दारू पिण्याच्या वादावरुन मयत मित्रास धक्का देवुन त्याला खाली पाडुन त्याच्या डोक्यात सिमेंटचा ब्लॉक घालुन त्यास गंभीर जखमी करून त्यास संपवुन टाकण्याच्या इरादयाने खुन केला असल्याचे कबुल केल्याने त्यास अटक करण्यात आली आहे.
ही कामगीरी पोलीस आयुक्त, पि चि शहर विनय कुमार चौबे, मनोज लोहीया सह पोलीस आयुक्त, संजय शिंदे अप्पर पोलीस आयुक्त, काकासाहेब डोळे पोलीस उप आयुक्त परि-०२, पदमाकर घनवट सहाय्यक पोलीस आयुक्त, देहुरोड विभाग शिवाजी गवारे वपोनि रावेत पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकातील विशाल जाधव सपोनि रावेत पोलीस ठाणे, परवेज शिकलगार सपोनि पोहवा/४२५ कोळगे, पोहवा/४७२ तिटकरे, पोशि/१६८१ जाधव, पोशि/२३४९ राउत, पोशि/२१६० तांबे, पोशि/२४८६ ब्राम्हण, पोशि/२२२७ वाकडे, पोशि/१३०९ रणदिवे, पोशि/ १६७९ देवकर यांनी केली आहे.















