- व्यापारी व नागरिकांवर लाठीहल्ला; दुकाने बंद करून आंदोलन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ जानेवारी २०२२) :- पिंपरी कॅम्पमध्ये अतिक्रमण कारवाई सुरू असताना अतिक्रमण पथक व व्यापारी यांच्यामध्ये वादावादी झाली. यानंतर व्यापाऱ्यांनी दुकाने बंद करून शगुन चौकात आंदोलन सुरू केले.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अतिक्रण विभागातर्फे पिंपरी कॅम्पातील अतिक्रमणावर कारवाई सुरु असताना व्यापऱ्यांनी कारवाईला विरोध दर्शवत गोंधळ घातला. अतिक्रमण पथक व व्यापारी यांच्यामध्ये वादावादी झाली. यानंतर भरारी पथकाने उपस्थित व्यापारी व नागरिकांवर लाठीमार सुरु केला. त्यानंतर व्यापाऱ्यांनी दुकाने बंद करून शगुन चौकात आंदोलन सुरू केले. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. वातावरण तणावपुर्ण होऊ लागल्याने पोलिसांना पाचारण करण्यात आले.
शहराची मुख्य बाजारपेठ म्हणून परिचित असलेल्या पिंपरी कॅम्प, शगुन चौकात अतिक्रमणामुळे नेहमीच वाहतूक कोंडी होत असते. पदपथ, रस्ते अतिक्रमणांनी गिळंकृत केले आहेत. त्यामुळे महापालिकेच्या अतिक्रण विभागाने कॅम्पातील अतिक्रमणावर धडक कारवाई सुरु केली आहे. महापालिकेच्या वतीने हॉकर्स झोन चे नियोजन केले जात नसून केवळ पधारीवाल्यांवर कारवाई केली जात असल्याचाही आरोपही येथील व्यापा-यांनी केला.


















