न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ जानेवारी २०२२) :- लग्न झाल्यापासुन फिर्यादी त्यांच्या सासरी नांदत होत्या. या दरम्यान आरोपींनी मिळुन फिर्यादी यांना वेळोवेळी शिवीगाळ करुन व दमदाटी केली. अपमानास्पद वागणुक देवुन, शारिरीक व मानसिक छळ केला. तसेच फिर्यादी यांचे आरोपी सासरे यांनी फिर्यादीसोबत दीड महीन्यापुर्वी रात्री २.०० वाजण्याच्या सुमारास त्यांच्या रुममध्ये जाऊन फिर्यादीसोबत जबरदस्तीने शारीरीक संबंध प्रस्थापित केले. त्यांनतरही पुन्हा दोन वेळा हा प्रकार घडला. याप्रकरणी कोणाला काही सांगितल्यास फिर्यादी यांना जीवे मारण्याची धमकी दिली, असे फिर्यादीत म्हटले आहे.
ही घटना (दि. २०/९/२०२०) फिर्यादीचे लग्न झाल्यापासुन अदयापपर्यंत. सिष्टा बिल्डींग, पवार वस्ती, चिखली येथे घडली.
याप्रकरणी महिला फिर्यादी यांनी आरोपी पती अमीर खान अब्दुल जब्बार खान (वय २५ वर्षे), महिला आरोपी, सासरे अब्दुल जब्बार खान (वय ६० वर्षे), महिला आरोपी, महिला आरोपी, ननंदेचा पती वसिम चौधरी, महिला आरोपी (सर्व रा. पवार वस्ती, चिखली) यांच्या विरोधात चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु आहे.


















