न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ जानेवारी २०२३) :- पिंपरी- चिंचवड महापालिकेच्या थेरगावमधील शाळेत सुरू असलेल्या कर संकलन कार्यालयाचे स्थलांतर ग क्षेत्रीय कार्यालयात करण्यात आले आहे, अशी माहिती कर संकलन विभागाचे सहाय्यक आयुक्त निलेश देशमुख यांनी दिली.
शहरातील मालमत्ताधारकांकडून पालिकेच्या कर आकारणी व कर संकलन कार्यालयाकडून कर वसुली केला जातो. यासाठी शहराच्या विविध भागात कर संकलनासाठी १७ कार्यालये आहेत. तसेच कर भरण्यासाठी ऑनलाइन सुविधांसह विविध अॅपची सुविधा उपलब्ध आहे.
थेरगावात यापूर्वी पालिकेच्या शाळेमध्ये कर संकलन विभागाचे कार्यालय होते. या कार्यालयाचे ग क्षेत्रीय कार्यालयात स्थलांतर झाले आहे. परिसरातील नागरिकांनी कर भरून पालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन देशमुख यांनी केले आहे.


















