न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ जानेवारी २०२३) :- राज्यात ११ जानेवारी ते १७ जानेवारी या कालावधीत रस्ता सुरक्षा सप्ताह आयोजित केला आहे. पिंपरी- चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने रस्ता सुरक्षा अभियानाचे उद्घाटन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अतुल आदे यांच्या हस्ते झाले.
सुरक्षा सप्ताहानिमित्त उपप्रादेशिक परिवहन कार्यालय व न्यू पिंपरी -चिंचवड मोटार ड्रायव्हिंग स्कूल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने रस्ता सुरक्षासंदर्भात वाहनांची रॅली भक्ती शक्ती चौक ते ट्रॅफिक पार्कदरम्यान काढण्यात आली.
यावेळी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अतुल आदे, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी सुरेश आव्हाड यांच्यासह आरटीओ अधिकारी, कर्मचारी तसेच न्यू पिंपरी- चिंचवड मोटार ड्रायव्हिंग स्कूल असोशिएशनचे अध्यक्ष सुनील बर्गे, टोंगळे, अण्णा कुंभार, दत्ता घाडगे आदींसह मोटार ड्रायव्हिंग स्कूलचे संचालक यावेळी उपस्थित होते.
रॅलीत ७० ते ७५ वाहनांना रस्ता सुरक्षा जनजागृती संदर्भाने फलक लावून तसेच कार्यालयाचे इंटरसेप्टर वाहनातून नागरिकांचे प्रबोधन केले. ट्रैफिक पार्क येथे चाचणीसाठी आलेल्या, रॅलीत सहभागी झालेल्या सर्व नागरिकांचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अतुल आदे यांनी प्रबोधन केले.


















