न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ जानेवारी २०२२) :-“ तुला मी फुक्कट साभांळतोय; माझे दोन मुले माझ्याकडे देवुन तु तुझ्या घरी निघुन जा ” असे म्हणत आरोपी पतीने फिर्यादी पत्नीला शारिरीक, मानसिक त्रास दिला आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे.
हा प्रकार (सन २०१८ ते दि. ११/०१/२०२३) दरम्यान फिर्यादी राहत असलेल्या वेगवेगळया ठिकाणी सध्या दिपकभाऊ भोईर यांच्या रुममध्ये, भोईर कॉलनी, चिंचवड येथे घडला.
महिला फिर्यादी यांनी आरोपी जिवनसिंग अंबरसिंग काकरवाल (वय २९ वर्षे, धंदा:- काहीच नाही रा. भोईर कॉलनी, चिंचवड) याच्या विरोधात चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.