- नोकरी लावण्याच्या आमिषाने तरुणांकडून महागड्या वस्तू लाटल्या…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ जानेवारी २०२२) :- सायबेज कंपनीमध्ये डायरेक्टर असल्याचे भासवून आरोपीने फिर्यादी व फिर्यादीच्या मित्रांचा विश्वास संपादन केला. कंपनीमध्ये नोकरीस लावतो असे खोटे आश्वासन दिले. बनावट मेल आयडीद्वारे फिर्यादीला मेल पाठवला.
फिर्यादीकडुन ८३,२५० रुपये किंमतीचा अॅपल कंपनीचा मॅकबुक लॅपटॉप तसेच गौरव होवाळे या फिर्यादीच्या मित्राकडुन १,२७,११७ रुपये किंमतीचा सॅमसंग कंपनीचा झेड फोल्ड मोबाईल फोन व २९,२७८ रु. किंमतीचा अॅपल कंपनीचा आयपॅड तसेच ५७,००० रुपये किंमतीचा अॅपल कंपनीचा फोन, २२,००० रुपये किंमतीचा वन प्लस कंपनीचा मोबाईल तसेच विनय भदरेकडुन ३६,०६८ रु किंमतीचा वन पल्स कंपनीचा मोबाईल फोन व ८३,८३५ रुपये किंमतीचा अँपल कंपनिचा मॅकबुक लॅपटॉप, ६९,९०० रुपये किंमतीचा अॅपल कंपनीचा आय फोन आणि फिर्यादीचे ५५,००० रोख रक्कम असे एकुण ५,६३,४४८ रुपये किंमतीचा ऐवज स्विकारुन व परस्पर त्याची विक्री करुन त्या वस्तुंचा व रक्कमेचा अपहार केला. नोकरीस न लावता फिर्यादी व फिर्यादीबरोबर फिर्यादीचे वर्ग मित्र गौरव होवाळे व इतर मित्रांची फसवणुक केली आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे.
ही घटना (दि १४/१२/२०२२ पासुन ते आजपर्यंत) डांगे चौक, थेरगाव येथे घडली. २२ वर्षीय महीला फिर्यादी यांनी फरदिन फिरोज खान (वय २३ वर्षे रा. रस्टन कॉलनी, चिंचवड) याच्या विरोधात वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
















