- ज्ञानोबांच्या आळंदीत प्रलोभनं दाखवीत जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न..
- चौदा जणांच्या विरोधात आळंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ जानेवारी २०२२) :- गावातील लोकांच्या घरासमोर जात ‘ तुम्ही बायबल वाचता का? चर्चमध्ये या, तुमच्या धंदयाला आम्ही आर्थिक मदत करू, असे म्हणत आरोपींनी दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे.
हा प्रकार (दि. १५) रात्री १०.३० वा. चे सुमारास मरकळ येथील फिर्यादीच्या घरी, आळंदी येथे घडला.
फिर्यादी प्रसाद भाउसाहेब साळुंके (वय २५ वर्षे, धंदा सलून व्यवसाय, रा. मरकळ) यांनी आरोपी प्रदिप मधुकर वाघमारे (रा. च-होली), प्रषांत मधुकर वाघमारे (वय ३० वर्षे), रोनक शैलेश शिंदे (वय १८ वर्षे, रा. संत तुकाराम नगर, येवले यांचे भाडयाचे खोलीत, भोसरी), तेजस प्रकाश चांदणे (वय ३२ वर्षे, पीसीएमटी बस स्टॉप गव्हाणे वस्ती, भोसरी), अशोक मुकेश पांढरे (वय १९ वर्षे, रा. चक्रपाणी वसाहत, भोसरी), मुकेश जयकुमार विश्वकर्मा (वय २५ वर्षे रा डोळसचाळ, पुरबजी सुपर मार्केट, पाठीमागे भोसरी), लक्ष्मण श्रीरंग नायडु (वय ३५ वर्षे, रा. संजिवनी हॉस्पीटल सर्वे नंबर ६३ ममता स्वीट चौक, भोसरी), म्यंगी ब्यवंग युन (वय ३८ वर्षे, रा. पांजरपोळ, इंद्रायणीनगर भोसरी), ज्यईल वोमन वन (वय ३६ वर्षे रा. पांजरपोळ, इंद्रायणीनगर भोसरी), ईशा भाउसाहेब साळवे (वय १९ वर्षे, रा. ममता स्वीट चौक, ता. हवेली), महीला आरोपी (वय ३३ वर्षे), महीला आरोपी (१८ वर्षे), महीला आरोपी (वय २४ वर्षे) विधीसंघर्षग्रस्त बालीका (वय १७ वर्षे) यांच्या विरोधात आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
















