न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ जानेवारी २०२२) :- गंभीर स्वरुपाचा गुन्हा करण्याच्या उद्देशाने आरोपी हा (दि. १५) रोजी सायं ५:३० वाजेच्या सुमारास लोखंडी कोयता जवळ बाळगून थेरगाव येथील एम.एम. शाळेजवळील रस्त्याच्या कडेला थांबला असल्याची माहिती वाकड पोलिसांना मिळाली.
पोलिसांनी कारवाई करीत आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्याकडून लोखंडी कोयता जप्त केला. स्वप्निल नागनाथ चंदनशिवे (वय २४, रा. छत्रपती चौक, रहाटणी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
















