- शासकीय कामकाजाच्या फाईल्स कोणत्याही संगणकावर वाचता येणार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ जानेवारी २०२२) :- पिंपरी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सर्व विभाग व कार्यालयात तसेच, सार्वजनिक उपक्रमांमध्ये मराठी युनिकोडचा वापर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. युनिकोडचा वापर करण्याचे सक्त निर्देश पालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहेत.
पालिकेच्या वतीने शुक्रवार (दि. १४) ते शुक्रवार (दि. २८) या कालावधीत मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करण्यात येत आहे. त्या निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
राज्य शासनाच्या परिपत्रकानुसार पालिका कार्यालयात मराठी भाषेतील कामकाजामध्ये अधिक सुसूत्रता आणण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. कोणत्याही संगणकावर तयार केलेल्या शासकीय कामकाजाच्या फाईल्स कोणत्याही संगणकावर वाचता याव्यात. त्या भविष्यासाठी व्यवस्थित रित्या जतन करणे सोयीचे व्हावे यासाठी महाराष्ट्र राजभाषा अधिनियम, १९६४ नुसार वर्जित प्रयोजने वगळता सर्व महापालिका कार्यालयांमध्ये युनिकोड मराठीचा वापर अनिवार्य करण्यात आला आहे. पालिकेच्या सर्व कार्यालयांत तसेच, सार्वजनिक उपक्रमांमध्ये मराठी युनिकोडचा वापर करणे बंधनकारक केले आहे. तसे परिपत्रक अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे यांनी काढले आहे.


















