लहान वयातच मुलांच्या मेंदूची सक्रियता सुधारण्यावर क्लासेसची भर – सौ. इंदू खांडेकर..
पिंपळे सौदागरमध्ये इम्पेटस कोचिंग क्लासेसची राष्ट्रीय अबॅकस आणि वैदिक गणित स्पर्धा उत्साहात संपन्न…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ जानेवारी २०२२) :- पिंपळे सौदागर येथील इम्पेटस कोचिंग क्लासेसच्या वतीने नुकतीच दुसरी राष्ट्रीय खुली अबॅकस आणि वैदिक गणित स्पर्धा उत्साहात पार पडली. ही स्पर्धा ऑनलाइन आणि ऑफलाइन या दोन्ही पद्धतीने संपन्न झाली. इम्पेटस कोचिंग क्लासेसच्या विविध केंद्रांमधून ५ ते १४ वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत भाग घेतला. परीक्षार्थींना परीक्षेतील प्रश्न सोडविण्यासाठी ६ मिनिटांचा अवधी देण्यात आला होता. या स्पर्धेत दोनशेपेक्षा अधिकजण सहभागी झाले होते. शौर्य नाईक हा चॅम्पियन ऑफ चॅम्पियन ठरला. शिवाय प्रथम, द्वितीय आणि तृतीय वर्गवारीनुसार पारितोषिकासाठी विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली.
परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांना कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या उन्नती सोशल फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ. कुंदाताई संजय भिसे आणि इम्पेटस कोचिंग क्लासेसच्या अध्यक्षा सौ. इंदू खांडेकर यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. यावेळी क्लासेसच्या सुनयना बागुल, मिनाक्षी वाणी, छाया मदने, सविता जाधव, स्मिता गायकवाड, तृप्ती गरीबे, कविता खांडेकर, संपदा सांगवीकर, रचना पटले, सुलोचना पवळे, सोनाली जांभळे सह समन्वयक सुचेता कंडाळकर, विद्या देशमुख आणि पालक तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सौ. कुंदाताई भिसे म्हणाल्या, “इम्पेटस कोचिंग क्लासेसचे विद्यार्थी अबॅकस आणि वैदिक गणित पद्धतीत आज चमकदार कामगिरी करीत आहेत. सौ. इंदु खांडेकर या गेल्या ११ वर्षांपासून सचोटीने त्यांचे क्लासेस पिंपळे सौदागर येथे चालवत आहेत. त्या व त्यांची संपूर्ण टीम अबॅकस आणि वैदिक गणित उत्कृष्ट पद्धतीने मुलांना शिकवतात. अबॅकसमुळे मुलांची अंकगणिताची भिती पूर्णत: जाते. लहान मुलांना त्यांच्या शालेय दशेत सतावणारं मॅथ्स म्हणजे गणित अगदी सोप्प होऊन जातं. नुसतंच ते नाही तर त्यांची कल्पनाशक्ती, एकाग्रता, तर्कशक्ती (creativity, concentration), स्मृती (memony) यांचा विकास होतो. आणि सगळ्यांत महत्त्वाचे म्हणजे त्यांचे visual skill develop होते. त्याचप्रमाणे वैदिक गणितामुळे आपली परंपरा जपली जाते आणि मुलांची competitive exam ची तयारी छान होते. एकंदरीत इंपेट्स क्लासेस हे एक सामाजिक काम करत आहे.
सौ. इंदू खांडेकर म्हणाल्या, “ शिक्षण हा प्रकार समजून घेण्यावर आधारित असला पाहिजे. जे आम्ही अबॅकस आणि वैदिक गणिताच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिकवतो. केवळ तात्पुरती नव्हे तर जीवनाच्या अनेक पैलूंमध्ये विद्यार्थ्याला या शिक्षणाची मदत कशी होईल? याकडे आमच्या क्लासचा नेहमीच कटाक्ष असतो. लहान वयातच मुलांच्या मेंदूची सक्रियता सुधारण्यावर आम्ही लक्ष केंद्रित करतो. संस्थेच्या या उपक्रमाला पालकांचा देखील मोठा प्रतिसाद मिळतो. इम्पेटसच्या वतीने अबॅकस (५+ वर्ष), वैदिक गणित (११+ वर्ष), तसेच शिक्षक प्रशिक्षण क्लासेसचे नियमित वर्ग भरविण्यात येतात. इच्छुकांनी प्रवेशासाठी 8412033399 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन सौ. खांडेकर यांनी केले आहे.


















