न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ जानेवारी २०२२) :- एमआयडीसी रावेत येथील अशुद्ध पाणी पुरवठा केंद्रामधील देखभाल-दुरुस्तीची कामे गुरुवारी (दि. १९) सकाळपासून करण्यात येणार आहेत. त्यादिवशी पिंपरी-चिंचवड शहराला होणारा पाणीपुरवठा दिवसभर बंद राहणार आहे.
तसेच, शुक्रवारी पाण्याचा पुरवठा अपुरा व कमी दाबाने होण्याची शक्यता आहे. तरी पिंपरी- चिंचवड, भोसरी, देहूरोड, कासारवाडी, फुगेवाडी, निगडी, सीएमई, आर अँड डी, दिघी, व्हीएसएनएल, कॅन्टोन्मेंट बोर्ड, ओएफडीआर या भागातील सर्व पाणीपुरवठा विस्कळीत होणार आहे. नागरिकांनी आवश्यक तो पाण्याचा साठा करून ठेवावा, असे आवाहन एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी केले आहे.
















