न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ जानेवारी २०२२) :- गोमांसाने भरलेला टेम्पो (Mh.05.DK.6079) गोरक्षकांनी खडकी पोलिसांच्या मदतीने ताब्यात घेतला. पोलिसांनी टेम्पो चालक सय्यद शोयाब अजीज व क्लिनर तन्वीर अहमद कुरेशी (दोघे रा. मुंबई) यांच्याकडे मांसाबाबत चौकशी केली.
त्यांनी सोलापूर येथून गायी व बैलाचे मांस आणले. मुंबई येथे घेऊन जात असल्याचे पोलिसांना सांगितले. पशुवैद्यकीय अधिकारी व पोलिसांच्या मदतीने टेम्पोचे शटर वर करून पाहणी केली असता गोवंशाचे पाय, मांस व अवयव कातडी काढलेल्या अवस्थेत दिसून आली.
पोलिसांनी महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्याप्रमाणे गुन्हा नोंद केला. यासंदर्भात मानद पशुकल्यान अधिकारी शिवशंकर स्वामी यांनी फिर्याद दिली आहे. या कारवाईत कौस्तुभ सोमवंशी, कृष्णा सातपुते, अनवित अंगिर, हिमांशू गरसुंद, ओमकार बेलीटकर, योगेश बेलिटकर, सचिन मरगले गोरक्षकांनी सहभाग घेतला.
















