न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ जानेवारी २०२२) :- पिक अप गाडी (एम.एच १४ इ.एम. ६८०१) फिर्यादीच्या चुलत्यांचा अपघात झाला आहे, असे फिर्यादीला समजले. फिर्यादी हे कासारवाडी, भोसरी फाटा येथे गेले. त्यावेळी फिर्यादीच्या चुलत्यांच्या पिकअपला पाठीमागुन काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओने पाठीमागुन धडक दिल्याचे समजले. घटनास्थळी आरोपीसह आठ ते दहा इसम उभे होते. त्यावेळी फिर्यादीच्या चुलत्यांच्या गाडीचे चालक मारुती गोपाळे यांना गाडीची नुकसान भरभाई भरून दे असे म्हणत चालकाला हाताने मारहाण केली. आरोपी सोबतच्या सहा ते सात अनोळखी इसमांनी फिर्यादीला शिवीगाळ करून, हाताने तसचे हातातील कडे फिर्यादीच्या डोक्यात, तसेच डाव्या डोळ्यावर मारून जखमी केले. तिथून जाताना आरोपींनी फिर्यादीला जिवे मारण्याची धमकी दिली, असे फिर्यादीत म्हटले आहे.
हा प्रकार (दि. २२/१२/२०२२) रोजी दुपारी ३.०० वाजता महिंद्रा शोरूम, रामनगर, चिंचवड येथे घडला.
फिर्यादी खालिद अकिल मुजावर (वय २३ वर्षे, धंदा व्यवसाय, रा. जामा मज्जिद जवळ, पिंपरी) यांनी आरोपी प्रथमेश ऊर्फ दादया भोसले (वय ३५ वर्षे पूर्ण नाव व पत्ता माहीत नाही) व त्याच्यासोबत असलेले सहा ते सात अनोळखी इसम यांच्या विरोधात निगडी पोलिसात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
















