न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ जानेवारी २०२२) :- व्हॉटसअपवर https://t.me/+Z4tcQglqPHhjYmE1 लिंक आली. लिंकवर फिर्यादीने जॉईन रजिस्टेशन केले. त्यांनतर फिर्यादी यांना व्हिडीओ पाठविण्यात आले. व्हिडीओला लाईक केल्यानंतर फिर्यादी यांना प्रत्येक व्हिडीओ साठी ५० रुपये मिळणार, असे सांगीतले. त्यानुसार फिर्यादी यांनी त्या व्हिडीओला लाईक केले. टास्कसाठी रजिस्टेशन फि लिंक वर भरावी लागणार होती. फिर्यादीने हे टास्क एक वेळा केल्यांनतर त्यांना लगेच बोनस व त्यांची रक्कम परत मिळाली. असे एकूण १६ वेळा रिफंड मिळाला. फिर्यादी यांनी टास्क मध्ये १२,२३,५०० रुपये गुंतविले. फिर्यादी यांनी रक्कमेचा रिंफड व बोनस विचारला असता त्यांनी टेलीग्रामवरील ग्रुप बंद केला व फिर्यादी यांची फसवणुक केली, असे फिर्यादीत म्हटले आहे.
ही घटना (दि. १४) रोजी सायंकाळी ५.४२ ते (दि. १५) रोजी ८.०६ पर्यंत ब्लुरिज सोसायटी, सदनिका नं ११०३, टॉवर ४, हिंजवडी येथे घडली.
फिर्यादी रवि शंकर सोनकुशरे (वय ४३ वर्षे, व्यवसाय नोकरी, रा. हिंजवडी) यांनी आरोपी अनोळखी इसमाच्या विरोधात हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
















