न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ जानेवारी २०२२) :- चिंचवड विधानसभा पोटनिवडणक आज निवडणूक आयोगाने जाहीर केली आहे. दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचे नुकतेच निधन झाले. त्यामुळे भाजपकडून जगताप यांच्या पत्नी अश्विनी किंवा बंधू शंकर जगताप यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता दाट वर्तविण्यात येत आहे.
या निवडणूकीसाठी ३१ जानेवारीला अधिसूचना प्रसिद्ध होणार आहे. ७ फेब्रुवारीला अर्ज दाखल करण्याचा अंतिम दिनांक असणार आहे. त्यामुळे उमेदवार ठरविण्यास पक्षांना वीस दिवसांचा अवधी मिळणर आहे. मतदान २७ फेब्रुवारीला होणार असून निवडणूकीचा निकाल २ मार्चला जाहीर होणार आहे.
गत निवडणुकीत जगताप यांच्या विरोधात शिवसेनेचे माजी शहरप्रमुख राहुल कलाटे यांनी निवडणूक लढविली होती. राष्ट्रवादी कॉँग्रेसने त्यांना पाठिंबा दिला होता. त्यामुळे या जागेवर निवडणूक झाल्यास राहुल कलाटे, राष्ट्रवादीचे नाना काटे यांचे नाव सध्यातरी पुढे येताना दिसत आहे. भाऊंच्या पत्नी अश्विनी जगताप यांना भाजपने उमेदवारी दिल्यास या मतदारसंघात निवडणूक बिनविरोध होण्याचा दाट अंदाज आहे.
















