- पोटनिवडणुकीसाठी आयोग हीच यादी ग्राह्य धरणार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ जानेवारी २०२३) :- चिंचवड विधानसभा मतदारसंघाची अंतिम मतदारयादी जिल्हा निवडणूक शाखेकडून ५ जानेवारीला प्रसिद्ध करण्यात आली आहे. हीच यादी पोटनिवडणुकीसाठी वापरण्यात येणार आहे. त्यानुसार चिंचवडमध्ये पाच लाख ६६ हजार ४१५ मतदार आहेत.
चिंचवड मतदारसंघात प्रारूप मतदार यादीत पाच लाख ६१ हजार ९८८ मतदार होते. या मतदारांत ४४२७ ने वाढ झाली असून अंतिम मतदारयादीत पाच लाख ६६ हजार ४१५ मतदार झाले आहेत. मतदारसंघात पुरूष मतदार ३,०१,६४८ असून महिला मतदार २,६४,७३२ तर तृतीयपंथी ३५ मतदार आहेत.
दरम्यान, प्रारूप मतदार यादी गेल्या वर्षी ९ नोव्हेंबरला जाहीर करण्यात आली होती. त्यानंतर नवमतदार, समाजातील वंचित घटकांसाठी मतदार नोंदणीच्या खास मोहिमांचे आयोजन केले होते. त्यामुळे प्रारूप मतदार यादीनंतर अंतिम यादीत मतदार वाढले आहेत.
मतदार यादीत नाव आहे किंवा नाही हे पाहण्यासाठी http://www.nvsp.in या संकेतस्थळावर किंवा voters helpline या मोबाइल उपयोजनवर (ॲप) संपूर्ण नाव, वय, लिंग, राज्य, जिल्हा आणि विधानसभा मतदारसंघ ही माहिती भरल्यानंतर समजेल.