न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ जानेवारी २०२३) :- दाजीला आणण्यासाठी फिर्यादी हे तळेगाव चौक येथे इनोव्हा (एमएच १४ एलबी ७०००) गाडी घेवून थांबले होते. दरम्यान तहान लागल्याने तळेगाव रस्त्यावरून जाताना हॉटेल अथवा टपरी उघडी आहे का? हे पाहाण्यासाठी कारने जात असताना इंडियन ऑईल पेट्रोल पंपाजवळ अनोळखी इसम फिर्यादीला दिसला. फिर्यादीने तंबाखूसाठी त्याला लिफ्ट दिली. फिर्यादी अनोळखी व्यक्तीला घेऊन परत आंबेठाण रस्त्यावरील चौधरी ट्रेडर्स येथे गेले.
अज्ञात व्यक्तीने चौधरी ट्रेडर्सच्या दुकानाजवळ गाडी थांबवली. रूममध्ये जावून तंबाखू घेवून येतो असे फिर्यादीला सांगितले. तेव्हढ्यात दोन जणांनी हातापायाने व लोखंडी रॉडने लिफ्ट मागितलेल्या व्यक्तीला मारहाण केली. फिर्यादीलाही हातापायाने व लोखंडी रॉडने डोक्याला, अंगाला मारहाण केली, असे फिर्यादीत म्हटले आहे.
ही घटना (दि. २२) रोजी रात्री १२.०० वा. सुमारास तळेगाव-चाकण रस्त्यावर घडली. फिर्यादी ओंकार अरविंद तरकसबंद (वय ३० वर्षे, व्यवसाय कॅन्टीन/हॉटेल, रा. रोशर इन्क्व्हीव, प्लॅट नं. ३०६, आगरकरवाडी रोड, चंदूकाका सराफ दुकानासमोर, चाकण) यांनी आरोपी अज्ञात दोन व्यक्तींविरोधात चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.