न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ जानेवारी २०२३) :- हिंदुह्रदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त उद्धव ठाकरे शिवसेना-युवासेना पिंपरी चिंचवड जिल्हा यांच्या वतीने ‘ हिंदुह्रदयसम्राट कबड्डी चषक २०२३ ‘ चे आयोजन चिखली येथे करण्यात आले होते.
स्पर्धेचे आयोजन विभागप्रमुख नितीन बोंडे व उपविभागप्रमुख प्रविण पाटील यांनी तसेच शिवसेना युवासेना शाखा ताम्हाणेवस्ती, म्हेत्रेवस्ती, रूपीनगर, त्रिवेणीनगर, मोरे वस्ती यांनी केले होते.
स्पर्धेसाठी आमदार, पुणे जिल्हा संपर्कप्रमुख सचिन अहिर, भोसरी विधानसभा संपर्कप्रमुख केसरीनाथ पाटील, युवासेना विस्तारक निलेश बडदे, शहरप्रमुख सचिन भोसले, जिल्हा संघटिका सुलभा उबाळे, भोसरी विधानसभाप्रमुख धनजंय आल्हाट व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
या स्पर्धेत प्रथम बक्षिस क्रांती मित्र मंडळ कबड्डी संघ (पिंपळे गुरव), द्वितीय बक्षिस श्री फत्तेचंद जैन कबड्डी संघ (चिंचवडगाव), तृतीय बक्षिस भैरवनाथ कबड्डी संघ (भोसरी) यांनी पटकवले. या स्पर्धेसाठी बक्षिस सौजन्य संतोष सौंदणकर, नेताजी काशिद, सुजित तांबोळी, शशिकांत पाटील, सतिश मरळ, दादाराव ठाकरे, सुर्यकांत देशमुख यांनी केले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सर्जेराव कचरे तर, शञुघ्न गोडगे यांनी आभार मानले.