- राष्ट्रवादी युवकच्या वतीने कासारवाडीत प्रजासत्ताक दिन साजरा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ जानेवारी २०२३) :- स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि मुलभूत अधिकार बहाल करणारे संविधान राष्ट्राचा अमुल्य ठेवा असून आजच्या दिवशी ते अमलात आले. देशाची अखंडता, एकता व सार्वभौमत्व अबाधित राखण्यासाठी संविधानिक मूल्यांची जपणूक करण्याचा संकल्प प्रत्येक भारतीय नागरिकाने करायला हवा. जगाने आदर्श म्हणून गौरवलेल्या भारतीय संविधानाचा व लोकशाहीचा सन्मान द्विगुणित करण्यासाठी सर्वंकष प्रयत्न करण्याचा निश्चय करूया, असे आवाहन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष इम्रान शेख यांनी कासारवाडी येथे केले.
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष इम्रान भाई शेख, उपाध्यक्ष ओम शिरसागर, वॉर्ड अध्यक्ष सतीश यादव, वसीम शेख, शशांक घावटे,अतिक आत्तार, अर्श शेख, अनिस सय्यद, समाद शेख, अल्ताफ शेख, सिकंदर शेख, शारुख शेख, इब्राहिम शेख हे पदाधिकारी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे आयोजन प्रभाग ४२ चे प्रभाग अध्यक्ष शाहीद शेख यांनी केले. यावेळी लहान मुलांना खावू वाटप केले गेले. नागरिकांना प्रजासत्ताक दिनानिमित्त शुभेच्छा देण्यात आल्या.

















