- भाजपचे दिवंगत आ. लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी आणि बंधूंनी नेला निवडणुक अर्ज?..
- आज राष्ट्रवादीकडून दोन तर शिवसेनेकडून एकाने नेले नामनिर्देशन पत्र?…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ फेब्रुवारी २०२३) :- चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसंदर्भात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. भाजपकडून अश्विनी लक्ष्मण जगताप, दिवंगत आमदारांचे बंधू शंकर जगताप, माजी गटनेते राहुल कलाटे, माजी विरोधी पक्षनेते नाना काटे या चार बड्या इच्छुकांनी आज गुरुवारी (दि. २) रोजी थेरगाव येथील निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयातुन उमेदवारी अर्ज नेले असल्याची माहिती मिळतेय. शिवाय बुधवारी राष्ट्रवादीचे राजेंद्र जगताप, माया बारणे यांनीही उमेदवारी अर्ज नेल्याचे कळतेय.
आज एका उमेदवाराने नामनिर्देशन पत्र दाखल केले आहे. तर १७ व्यक्तींनी ३२ नामनिर्देशन पत्र नेले आहेत. आज अखेरपर्यंत एकूण ३ उमेदवारांनी ४ नामनिर्देशन पत्रे दाखल केलेली आहेत. तर ६२ व्यक्तींनी १०८ नामनिर्देशन पत्रे नेली आहेत.
भाजप अथवा महाविकास आघाडी कडून अद्यापही इच्छुकांच्या नावाची घोषणा करण्यात आलेली नाही. एकीकडे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचे बंधू शंकर जगताप हे भाजपकडून पोटनिवडणूकिसाठी इच्छुक आहेत. तर दुसरीकडं लक्षण जगताप यांच्या पत्नी अश्विनी लक्ष्मण जगताप यांनीही उमेदवारी अर्ज नेल्यामुळे भाजप नेमका कोणाला एबी फॉर्म देणार याचे कोडे राजकीय जाणकारांना पडले आहे.
दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचे निधन झाल्याने चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक लागली आहे. भाजपाकडून आणखी कोणी उमेदवारी अर्ज घेणार का हे देखील पाहणे तितकेच महत्त्वाचे आहे. दरम्यान, महाविकास आघाडीकडून अद्याप उमेदवार जाहीर केलेला नाही. त्यामुळे चिंचवड विधानसभा पोटनिवडणुक अत्यंत चुरशीची ठरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
आज नामनिर्देशन पत्र नेणाऱ्यांची नावे…
हरीश भिकोबा मोरे, विठ्ठल उर्फ नाना कृष्णाजी काटे, सोयल शहा युनूस शहा शेख, रेखा राजेश दर्शले, संजय भिकाजी मागाडे, किशोर आत्माराम काशीकर, अक्षय विनोद जाधव, हिरामण बाबु बाबर, अश्विनी लक्ष्मण जगताप, जितेंद्र रामचंद्र वाडघरे, विजय सुभाष कलाटे, प्रकाश रामचंद्र बालवडकर, उमेश महादेव म्हेत्रे, कैलाश दशरथ परदेशी, डॉ.बाळासाहेब उर्फ सोमनाथ अर्जुन पोळ, विनायक सोपान ओव्हाळ, सुभाष गोपाळराव बोधे.












