- देहूरोड पोलीस ठाण्यात दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ फेब्रुवारी २०२३) :- अपशब्द वापरून शिवीगाळ केल्याचा जाब विचारण्यासाठी फिर्यादीची आई आरोपीच्या घरी गेली. त्यावेळी आरोपी हा फिर्यादीच्या आईच्या अंगावर धावून आला. तिला हाताने तोंडावर कानफाडीत मारल्या. तेव्हा फिर्यादी आरोपीला अडविण्यासाठी गेल्या असता त्याने फिर्यादीस मारहाण करून शिवीगाळ केली.
फिर्यादीसोबत अश्लील कृती करीत त्यांना जोरात ढकलले. फिर्यादीच्या स्त्री मनास लज्जा उत्पन्न केली. सह आरोपी २ याने फिर्यादीचा भाऊ आश्राफ याला हाताने मारहाण केली, असे फिर्यादीत म्हटले आहे. हा प्रकार (दि. १) रोजी सायं ५.३० वा. एम.बी. कॅम्प, देहुरोड येथे घडला.
२४ वर्षीय महिला फिर्यादीने आरोपी विजय सुरेंद्र सुतार (वय १८ वर्ष, एम. बी. कॅम्प देहुरोड), शिवशंकर सुरेंद्र सुतार (वय २० वर्ष रा. एम.बी. कॅम्प देहुरोड) यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. देहुरोड पोलिसांनी आरपींविरोधात ७१/२०२३ भा.द.वि. कलम ३५४,३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलीस पुढील तपास करीत आहेत.
















