- हॉटेल चालकाने साथीदारांसोबत मिळून दुचाकी चालकाला बदडले…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ फेब्रुवारी २०२३) :- भाजीपाला खरेदी करण्यासाठी जाता असताना फिर्यादीने आरोपीच्या मालकीच्या हॉटेलसमोरील भाजीपाला मार्केटसमोर (एम.एच.१४ एच.डी १२९४) दुचाकी लावली. त्यावेळी आरोपी ‘तुझी गाडी माझ्या हॉटेलसमोर उभी करु नकोस ‘ असे फिर्यादीला म्हणाला. त्या कारणावरून फिर्यादी व आरोपीमध्ये भांडण झाले.
आरोपीने त्यानंतर गाळा मालकाला फोन करुन बोलावुन घेतले. त्यांनी आरोपी आणि फिर्यादीची समजुत घातली. फिर्यादी भाजीपाला घेण्यासाठी मार्केटमध्ये गेले. भाजीपाला खरेदी करुन परत दुचाकी घेण्यासाठी फिर्यादी आले असता आरोपीसह त्याचे इतर पाच साथीदार फिर्यादीच्या गाडीजवळ आले. ” तुला लय माज आला आहे का? असे म्हणत आरोपींनी फिर्यादीला लाथाबुक्या, हाताने मारहाण करण्यास सुरवात केली. लाकडी दांडक्याने पायावर व हातावर मारहाण केली, असे फिर्यादीत म्हटले आहे. ही घटना (दि. २९/०१/२०२३) रोजी सायं ६.०० वाजेच्या सुमारास स्वप्नील पानमंद याच्या मालकीचे हॉटेल वक्रतुंड, भांबोली भाजीपाला मार्केट समोर घडली.
फिर्यादी भाउसाहेब महादु गायकवाड (वय ५१ वर्षे, धंदा शेती, रा. भांबोली, ता खेड जि पुणे) यांनी आरोपी स्वप्नील युवराज पानमंद, अशोक वापूजी निखाडे, स्वप्नील निवृत्ती निखाडे, दिपक निवृत्ती निखाडे, गुलाब बाळासाहेब निखाडे, काळुराम बाळासाहेब निखाडे (सर्व रा. भांबोली) यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. म्हाळुंगे चौकी पोलिसांनी आरोपी आणि त्याच्या साथीदारांविरोधात पोलीस ठाण्यात १८६/२०२३ भादवि कलम ३२४,५०४, ५०६,१४३, १४७, १४८ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पोलीस पुढील तपास करीत आहेत.
















