न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ फेब्रुवारी २०२३) :- दापोडीतील बारा बंगला, एस.टी. रोड परिसरात आरोपीने अवैधरित्या दोनशे रुपये किंमतीचा लोखंडी कोयता जवळ बाळगल्याची माहिती भोसरी पोलिसांना मिळाली. पोलिसांनी (दि. १) रोजी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास कारवाई करीत आरोपीला ताब्यात घेतले.
लॉरेन्स अजय पिल्ले (वय १९ वर्षे, रा. सीएमई गेटसमोर, काटे चाळ, राज वाईन्समागे, दापोडी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यावर पोलीस ठाण्यात १०४ / २०२३, भारतीय हत्यार कायदा कलम ४ (२५), महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७ (१) (३) सहा १३५ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
















