न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ फेब्रुवारी २०२३) :- गेल्या दोन ते तीन वर्षांपासून निघोजेतील महिंद्रा कंपनीत आरोपी हे फिर्यादी माथाडी कामगांराचे आर्थिक शोषण व पिळवणुक करीत आहेत. कामगारांच्या दरमहा पगारातुन १५ ते २० हजार रुपयांची अर्थिक फसवणूक करीत आहेत. याबाबत फिर्यादी यांनी माथाडी बोर्डाला, महिंद्रा कंपनीतील प्रशासनाला कळविले. मात्र त्यांनी कोणतीही कार्यवाही केली नाही, असे फिर्यादीत म्हटले आहे.
फिर्यादी राजेंद्र कैलास नखाते (वय ३१ वर्ष, व्यवसाय मजुरी, रा. टेल्को कॉलनी, घर क्र २००८, गणेशनगर शेजारी, वडगाव मावळ) यांनी आरोपी नामदेव मधुकर कंद, नितीन दौडकर, नवनाथ थिटे, अतुल गारगोटे, राहुल आंद्रे, शरद कंद, संदीप मधुरे यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
म्हाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी आरोपी विरोधात १८३/२०२३ भा.द.वि. कलम ४२०, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पोलीस पुढील तपास करीत आहेत.
















