- भोसरी एमआयडीसीतील ऋतिक टुल्स कंपनीतील प्रकार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३ फेब्रुवारी २०२२) :- पतीची कंपनी वाढविण्याचे आमिष दाखवत आरोपीने फिर्यादी महिलेचा विश्वास संपादन केला. कंपनीमध्ये भागीदारी केली. डायरेक्टर असताना आरोपीने कंपनीतील कर्मचारी सह आरोपी २ याच्याशी संगणमत केले. सन २०१५ ते २०१७ मध्ये कंपनीमध्ये तयार झालेले मटेरियल एकुण १८,३१४ नगांची एकुण रक्कम १,७५,०४,१०२ रुपये (चलनावर आरोपी १ व २ यांची सही आहे). कंपनीमध्ये कोटिंगकरिता आलेले मटेरियल ९३७२९ नगांची एकुण रक्कम १,२८,४०,३२९ रुपये (चलनावर आरोपी १ व २ यांची सही आहे) यातील आरोपींनी एकुण ३,०३,४४,४३१ रुपयांचे बिल न बनवता त्यांचा खोटा हिशोब तयार करुन परस्पर कंपनीच्या ग्राहकांना विक्री केले.
कोटिंग केलेले मटेरियल त्यांना परत देवुन त्या ग्राहकांकडुन मटेरियलची रोख रक्कम कंपनीच्या खात्यावर जमा न करता ती स्वतः स्विकारुन ती स्वतःच्या फायदयाकरिता वापरली, असे फिर्यादी यांना चलन पुस्तके व बिल पुस्तकांच्या पाहणीवरुन समजले. तसेच आरोपीने फिर्यादीच्या कंपनीचा लॅपटॉप त्यामध्ये गोपनीय माहिती असलेला व फिर्यादीच्या कंपनीच्या ग्राहकांशी संवाद साधण्यासाठी त्यास दिलेल्या ई-मेलचा गैरवापर करुन फिर्यादीच्या कंपनीची फसवणुक केली आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे.
ही घटना ऋतिक टुल्स प्रा. लि. (ई.एल. ३७/४, जे-ब्लॅक, एम.आय.डी.सी, भोसरी) येथे घडली. ६० वर्षीय महिला फिर्यादीने आरोपी आनंद ईश्वरचंद मित्तल (वय ४३ वर्षे, धंदा व्यवसाय रा. सी- १२०३, पार्क टायटेनियम, पार्क स्ट्रीट, वाकड), तेजश्री भिमशा शेट्टी (वय: ३७ वर्षे, धंदा नोकरी, रा. फ्लॅट नं-५०३, सिल्हरलिफ सोसायटी, ए-विंग, दिघी रोड, भोसरी) यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. एमआयडीसी भोसरी पोलिसांनी आरोपींविरोधात ४२/२०२३ भा.दं.वि. कलम ४०९,४०६, ४२०, ४७७ प्रमाणे गुन्हा नोंद केला आहे.
















